पिंपरी : महिलेची कार चोरल्याप्रकरणी पतीसह दिरावर गुन्हा | पुढारी

पिंपरी : महिलेची कार चोरल्याप्रकरणी पतीसह दिरावर गुन्हा

पिंपरी : महिलेची कार चोरल्याप्रकरणी पतीसह दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 मे रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोनच्या कालावधीत आळंदी येथे घडली. पती अमरेंद्र रापर्तीवार (वय 54), मावस दीर वीरेंद्र प्रभाकर अदमुलवार (रा. शाहूनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमरेंद्र यांच्या पत्नीने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती विभक्त राहतात. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची कार मावस भाऊ विश्वजित संकपाळ यांच्या घरासमोर पार्क केली होती. दरम्यान, आरोपींनी त्यांची कार चोरून नेली. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button