मंगेश देसाई : आपली पहिली भेट मला आठवते शिंदे साहेब, अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत | पुढारी

मंगेश देसाई : आपली पहिली भेट मला आठवते शिंदे साहेब, अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेता, निर्माता मंगेश देसाई यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या निवडीनंतर मंगेश यांनी त्यांच्या फेसबूक पोस्ट लिहिलीय. मंगेश देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय तरी काय पहा –

eknath shinde
eknath shinde

आपली पहिली भेट मला आठवते साहेब.

वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो 2007 साली. तुम्ही आमदार होतात त्या वेळी. तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो. तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोललात. सचिन जोशीला मला तुमचं व्हिझिटींग कार्ड द्यायला लावलात आणि “काहीही मदत लागली तर सांगा “असं आवर्जून म्हणालात. माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच. तीही तुम्ही एका मिनटात केलीतही आणि त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एक भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो, तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात “हे कशाला? आपण मित्र आहोत मंगेश “.

आणि खरंच मित्र झालात. अजून एक प्रसंग आठवतो.

सगळे तुम्हाला नमस्कार करायचे, मी पण केला एकदा .तेव्हा “हे करत जाऊ नका. आपण मित्र आहोत .”असच म्हणालात. आणि खरंच मित्र झालात. आणि नंतर जसजसे वर्ष सरत गेले तसे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलात, प्रत्येक प्रसंगात. त्या बद्दल हृदयपूर्वक आभार साहेब.

माझी 2013 पासून मनात असलेली” दिघे “साहेबांवरच्या चरितपटाची मनोकामना पूर्ण करून माझी निर्माता म्हणून ओळख घडवलीत.

रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत त्या बद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात.

प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, माणसाशी माणुसकीने वागणारा, विरोधकांना नामवणारा आणि क्षमा करणारा अहोरात्र काम करणारा मी जवळून बघितलेला एक समाजकारणी मुख्यमंत्री झाला याचा खूप अभिमान वाटतो.

आपल्याला उदंड आयुष्य लाभो, महाराष्ट्र घडवण्यात तुमचा मोलाचा वाट राहो हीच दत्त गुरूंकडे प्रार्थना.

जय हिंद
जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐💐💐

Back to top button