पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहेत. निवडणूक कामकाजासाठी उभारण्यात येणार्या मंडपाचा खर्च 28 लाख 75 हजार 121 इतका आहे.
निवडणूक कामकामासाठी मंडप व्यवस्था करण्यासाठी स्थापत्य विभागाने 40 लाख खर्चाची निविदा काढली होती. त्यात शालिमार मंडप डेकोरेटर्सची 28.10 टक्के कमी व भाग्यदीप इंडस्ट्रीयल को-ऑपरेटीव्ह सोसायटीची 27.77 टक्के कमी दराची निविदा पालिकेस प्राप्त झाली. त्यातील 28 लाख 75 हजार लघुत्तम दराची शालिमार मंडप डेकोरेटर्सची निविदा पात्र ठरली. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.