जिंदगानी चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळणार; पोस्टर लॉन्च

जिंदगानी चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळणार; पोस्टर लॉन्च
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : जिंदगानी हा मराठी चित्रपट लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपट जिंदगानी चे पोस्टर लॉन्च झाले आहे.

अधिक वाचा – 

कोरोनाच्या आपत्तीवर मात करत अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे. बंद पडलेलं करमणुकीचे क्षेत्र नव्याने कामाला लागले आहे. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे उघडणार आहेत.

अधिक वाचा –

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' चित्रपट भेटीस येणार आहे.

अभिनेते शशांक शेंडे व विनायक साळवे यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांनी प्रभाकर आणि सदा या आदिवासी व्यक्तींच्या भूमिका साकारली आहे.

अधिक वाचा –

तसेच अभिनेत्री सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदीप नवले, यांच्या भूमिका आहेत.

गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दीपक तावरे, पांडुरंग भारती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

या चित्रपटाद्वारे वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केले आहे. विजय गवंडे यांनी गाणी संगीतबद्ध केलेली आहेत.

चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

हा चित्रपट बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा आहे.

हेदेखील वाचलंत का? – 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news