

रिंकी खाडे; पुढारी वृत्तसेवा: रात्रीस खेळ चाले फेम 'शेवंता' म्हणजेच अपूर्वा नेमळेकर चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. सध्या तिने मुंबईसह साताऱ्यात 'अपूर्वा कलेक्शन' या नावाच्या साड्याच्या दुकानाचे ओपनिंग केले आहे.
पूर्वी महिला नोकरी करत घर कशा संभाळतील? हा प्रश्न विचारला जात होता; परंतु, आता महिला घर, वैयक्तिक आयुष्य संभाळत यशाच्या टोकाला पोहोचल्या आहेत. यात मराठी अभिनेत्रींच नाव घेतलं जातं.
आपल्या सगळ्यांची लाडकी रात्रीस खेळ चाले फेम 'शेवंता' म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने स्वत:चं 'अपूर्वा कलेक्शन' नावाचं साड्यांचं आणि ज्वेलरीचे दुकान नुकतेच सुरू केलं आहे. नवल म्हणजे, या दुकानामधल्या सगळ्या साड्या या अपूर्वाने स्वतः डिझाइन केलेल्या आहेत. या साड्यांमध्ये पैठणीसारख्या मनमोहक साड्यांचा देखील समावेश आहे.
मुंबईपासून 'अपूर्वा कलेक्शन' चा सुरू झालेला प्रवास आता सातारापर्यंत पोहोचला आहे. सातारा येथील शाहूपुरी रोडवर सरस्वती कॉम्पलेक्समध्ये तिने हे दुकान सुरू केले आहे.
अपूर्वाने स्वत:ची वेबसाइट देखील सुरू केली आहे. या वेबसाईटवर ज्वेलरीच्या किंमत देखील चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.
अभिनय क्षेत्रात ठसा उमटविणारी ही अभिनेत्री आता फॅशन क्षेत्रात बिझनेस वुमन होण्यासाठी सज्ज झाली आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : एक स्त्री आणि दोन पुरूष एकत्र राहू शकतात का? नवी वेबसेरिज 'सोप्पं नसतं काही '