वैष्णवांच्या मांदियाळीने इंद्रायणी काठ गजबजला; हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल | पुढारी

वैष्णवांच्या मांदियाळीने इंद्रायणी काठ गजबजला; हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा; डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर उपरणे, हाती भगव्या पताका, गळ्यात तुळशीहार, वीणा आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हजारो वारकरी अलंकापुरीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी जमले असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या वैष्णवांच्या मांदियाळीने इंद्रायणी काठ गजबला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातून वारकरी आळंदीला पालखी प्रस्थान सोहळ्याकरिता मजल दरमजल करत जमलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीने इंद्रायणी काठ गजबजलेला असून, अनेक वारकरी या पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करण्याचा आनंद घेत आहेत.

एनडीआरएफची दोन पथके तैनात
इंद्रायणी काठी जमलेले असंख्य वारकरी या नदीत स्नान करण्याचा आनंद घेत आहेत. अनेक जण यात पोहत आहेत. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी येथे एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली असून, त्यांच्याद्वारे सातत्याने नदीत गस्त घालण्यात येत आहे.

सर्व्हीलायन्स व्हॅन सज्ज
इंद्रायणी काठी काही अनुचित प्रकार घडून नये ,याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व्हीलनस व्हॅन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

नगर : पोलिसांना चकवा देत डिझेल चोर पसार; वाहन सापडले पोलिसांच्या ताब्यात

मुसेवाला हत्येप्रकरणी तिघांना अटक

पृथ्वीवरील उल्केने उलगडले मंगळाचे रहस्य

Back to top button