Rubina Dilaik
Rubina Dilaik

Rubina Dilaik : रुबीनाच्या ग्रीन कलरच्या ड्रेसवर चाहते म्हणाले…

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १४ ची विजेती आणि अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik ) रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी १२' या शोमध्ये दिसलीय. या शोचे शूटिंग सध्या केपटाऊनमध्ये सुरू आहे. या दरम्यान रुबीना तिचे काही हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या तिच्या एका व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री रुबीना दिलैकने ( Rubina Dilaik ) तिचा इन्स्टाग्रांमवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पहिल्यांदा रुबीना डार्क ग्रीन रंगाच्या लॉन्ग गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसली. तर मोकळ्या केसांसह मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली. मात्र, काही सेंकदातच रुबीना ग्रीन रंगाच्या शर्ट आणि ब्लॅक रंगाच्या पॅन्टमध्ये एक गाडी धुताना दिसली.

खास करून या व्हिडिओत एकीकडे हॉट दिसणारी रूबीना लगेच पाण्याचा स्प्रे घेऊन घेवून गाडी धुताना दिसतेय. याच्या कॅप्शनमध्ये तिने 'सर्व ठिकाणी समतोल राखण्यासाठी आहे' असे लिहिले आहे. यावरून रूबीनाने जीवनातील कोणतेच काम हलक्या दर्जाचे नसल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहच्यांनी भरभरून कमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Gorgeous', 'क्युट', "खतरों के खिलाडी १२' शोची ट्रॉफी जिंकून ये', तर दुसऱ्या एका युजर्सने 'एवढे कोण कसं सुंदर असू शकत?', 'हिरवा रंग खूपच चांगला दिसतोय'. यासारख्या कमेंट्स केल्या आहेत. यासिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ६६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स तर एक हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

'खतरों के खिलाडी १२' या शोची ट्रॉफी कोण जिंकणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. रुबीना दिलैकसोबत शोमध्ये अनेक टीव्ही स्टार्सनी भाग घेतला आहे. यात शिवांगी जोशी, सृति झा, मोहित मलिक, कनिका मान, निशांत भट्ट, राजीव अदतिया आणि चेतना पांडे यांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news