Satyendra Jain : सत्येंद्र जैन यांना दिलासा नाहीच !; जामीन फेटाळला | पुढारी

Satyendra Jain : सत्येंद्र जैन यांना दिलासा नाहीच !; जामीन फेटाळला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन  (Satyendra Jain)  यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) तपास करण्यात येणाऱ्या या प्रकरणात जैन यांना जामीन देण्यास राऊस एवेन्यू न्यायालयाने नकार दिला आहे. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी आठवड्याच्या सुरुवातीला जामीन अर्जावरील आदेश राखून ठेवला होता. याचिकेवर आज (दि. १८ ) निकाल सुनावत न्यायालयाने जैन यांची याचिका फेटाळली.

पाच दिवसांची ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर जैन (Satyendra Jain) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. ९ जूनला त्यांना ९ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जैन यांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. अटकेनंतर ईडीने जैन यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, पूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने जैन यांचे वकील यांना चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी देणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button