पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री छवी मित्तल (Chhavi Mittal) कॅन्सरशी लढा देत आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. छवी स्वत: कॅन्सरशी लढा देत आहे आणि त्याचवेळी, ती तिच्या पोस्टद्वारे कॅन्सरशी लढणाऱ्या लोकांना प्रोत्साहनही देते. (Chhavi Mittal)
छवीने गुरुवारी तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, तिचे रेडिओथेरपी सत्र पूर्ण झाले आहे आणि आता काही दिवसांनी ती कर्करोगाशी पूर्णपणे लढाई जिंकणार आहे.
छवीने तिचे काही फोटो शेअर करत एक लांबलचक नोट लिहिली आहे. तिने लिहिले, "मी आता शांत राहू शकत नाही. कारण माझी रेडिएशन थेरपी संपली आहे!! मी फक्त इथून बरी होईल. मला पुढील ३० दिवस सर्व नियमांचे पालन करावे लागेल आणि मग मी यापासून पूर्णपणे मुक्त होईल" अभिनेत्रीने तिचे तीन फोटो शेअर केले आहेत आणि या सर्व फोटोंशी संबंधित एक किस्साही शेअर केला आहे.
तिने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक लांबलचक पोस्ट लिहून ही माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, ती या भयंकर आजाराशी कशी लढत आहे. यासोबतच तिने ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त सर्व महिलांना धीर दिला. तिने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने हा आजार कसा झाला हे सांगितले होते.
तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की, वर्कआउट दरम्यान तिला अचानक छातीत दुखलं. त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. तिथे तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे कळले. व्हिडिओमध्ये छवी म्हणाली होती, 'आज मी ही एक्सरसाईज यासाठी केला की कारण त्यानेच माझं आयुष्य वाचवलंय. मी स्वत:चे आभार मानले. मी चेकअपसाठी गेले आणि तेथे माझ्या शरीरात गाठ असल्याचे कळले. यानंतर माझं MRI, अल्ट्रासाऊंड आणि नंतर बॉयोप्सी झालं, तेव्हा समजलं की, ही कॅन्सरची गाठ आहे.'