आत्मविश्वास व्यक्तीला संघर्ष शिकवतो; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत | पुढारी

आत्मविश्वास व्यक्तीला संघर्ष शिकवतो; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली होऊ शकत नाही. मात्र, व्यक्तीकडे असलेला आत्मविश्वास जीवनात संघर्ष करण्यास शिकवतो’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. पुणे बार असोसिएशनतर्फे गर न्यायालयात अ‍ॅड. निकम यांचे फौजदारी खटल्यातील अनुभव आणि फौजदारी संहिता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान या कार्यक्रमात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या नवनिर्वाचित सचिव न्यायाधीश कश्यप यांचा सन्मान करण्यात आला. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग थोरवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी असोसिएशनचे पदधिकारी आणि वकीलवर्ग कार्यक्रमास उपस्थित होता. अ‍ॅड. निकम यांनी सांगितले, ‘चुका झाल्या तर हरकत नाही. चुकातून शिकता येते.

मात्र, आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.’ यावेळी अ‍ॅड. निकम यांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला आणि मुंबई येथील 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्याच्या खटल्याचे अनुभव सांगितले. ‘1993 बॉम्बस्फोटानंतर मुंबईत गेलो. त्यावेळी पोलीस आयुक्तालय कोठे हे माहिती नाही. मराठीत शिक्षण झाले होते. इंग्रजी बोलणार्‍यांचा सामना करू शकेल का, अशी शंका होती. मात्र, आत्मविश्वासामुळे हा खटला चालवू शकल्याचे’ निकम यांनी सांगितले.

हेही वाचा

ऐतिहासिक बुरूज मोजताहेत शेवटच्या घटका, जुन्नर येथील चिंताजनक स्थिती; जीवितहानीची दाट शक्यता

भोसरी चौकातील पांढरे पट्टे गायब

पिंपरी : चोरीप्रकरणी सहा महिन्यांनंतर गुन्हा

Back to top button