सोनमच्या पतीकडून अनुष्काला गिफ्ट! | पुढारी

सोनमच्या पतीकडून अनुष्काला गिफ्ट!

सोनम कपूर सध्या गर्भवती आहे आणि तिचा उद्योगपती पती आनंद आहुजा तिची काळजी घेत आहे, तिला इटलीमध्ये टूरसाठी नेत आहे. दुसरीकडे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीही सुट्टीचा आनंद घेत आहेत. मात्र, या दोन्ही जोडप्यांमधील परस्पर मैत्रीचे बंध इतके चांगले आहेत की आनंदने अनुष्काला तिला आवडेल असे एक गिफ्टही पाठवून दिले आहे. अनुष्काने सोशल मीडियात या गिफ्टचा फोटो शेअर करून आनंदचे आभार मानले आहेत. हे गिफ्ट आहे ब-ँडेड शूजचे. त्याचा फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आनंदच्या अनेक व्यवसायांमध्ये शूजचाही एक व्यवसाय आहे हे विशेष! त्याच्या शूज ब-ँडचे नाव ‘व्हेज नॉनव्हेज’ असे आहे. आपल्या या ब-ँडच्याच शूजची एक जोडी त्याने अनुष्काला भेट म्हणून पाठवली.

Back to top button