Border सिनेमाची स्टोरी ऐकून पंतप्रधान म्हणाले, हा चित्रपट झालाच पाहिजे

Border सिनेमाची स्टोरी ऐकून पंतप्रधान म्हणाले, हा चित्रपट झालाच पाहिजे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर (Border) सिनेमाचे गारुड आजही तरुणाईच्या मनावर आहे. या सिनेमातील अनेक सीन रणांगणावरील वाटतात. याचे कारणही तसेच आहे. यातील प्रमुख अभिनेते सोडले तर सर्व सहकलाकार खरे सैनिक होते. शस्त्रे खरी होती. कदाचित बॉर्डर (Border) त्यामुळे खूपच गाजला.

या सिनेमाच्या निर्मितीची कथाही रोचक आहे. या सिनेमासाठी थेट पंतप्रधान नरसिंह राव यांनी आग्रह धरला होता. या सिनेमामुळे फ्लॉप हा शिक्का पुसण्यात जे. पी. दत्ता यशस्वी ठरले होते.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी जवळ आला की टीव्हीवर बॉर्डर (Border) चित्रपट हमखास लागलेला असतो. देशप्रमावर असलेला हा चित्रपट १९९७ ला आला. पण आजही हा चित्रपट सगळ्यांचा प्रिय आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात १९७१ मध्ये झालेल्या लढाईवर हा चित्रपट आहे. पण हा चित्रपट बनवण्यासाठी स्वत: तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी आगृह धरला होता.

'सरहद' अपूर्ण राहिला

दिगदर्शक जे. पी. दत्ता यांनी 'सरहद' नावाचा चित्रपट बनवायला घेतला. या चित्रपटात विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती आणि बिंदिया गोस्वामीसारखे अभिनेते काम करत होते. या व्यतिरिक्त, नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी सारखे कलाकार देखील चित्रपटात दिसणार होते.

पण आर्थिक अडचणींमुळे हा चित्रपट ते पूर्ण करु शकले नाहीत. खरतर हा चित्रपट त्यांच्या करिअर मधील पहिलाच चित्रपट होता. पहिलाच चित्रपट पूर्ण न झाल्यामुळे ते निराश झाले. तुम्ही अनेक चित्रपट केलेत, पण पहिला चित्रपट पूर्ण करू न शकण्याचं दु:ख असतं. ते दु:ख जे.पी. दत्ता यांना सुद्धा होत.

वर्ष १९९६-९७

अखेर १९९६-१९९७ मध्ये एका चित्रपटाचं नियोजन झालं. त्याच नाव 'बॉर्डर'. या चित्रपटाची कथा घडलेल्या घटनेवर आधारित होती. दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांचा भाऊ दीपक दत्ता १९७१ मधील लढाईत एअर फोर्स मध्ये होते. त्यांच्याकडूनच 'बॉर्डर' ची कल्पना जे.पी. दत्ता यांना मिळाली.

चित्रपटातील एक क्षण
चित्रपटातील एक क्षण

१९७१ च्या लढाई नंतर जे.पी. दत्ता यांचा भाऊ दीपक सुट्टीसाठी घरी आले होते. त्यावेळी युद्धातील झालेल्या सर्व घटना दीपक यांनी जे.पी. दत्ता यांना सांगीतल्या. या सर्व घटना दत्ता यांनी डायरीतं नमूद करुन घेतल्या. पुढं १९८७ मध्ये जे. पी. यांच्या भावाचा मिग २१ च्या अपघातात मृत्यू झाला. याचवेळी त्यांनी १९७१ च्या लढाईचा चित्रपट बनवायचं ठरवलं. 'बॉर्डर' मधील विंग कमांडर अँडी बाजवाचे पात्र दीपक यांच्यापासून प्रेरित होते. हे पात्र जॅकी श्रॉफने साकारले होते.

border च्या तयारीला सुरुवात

'बॉर्डर' हा भारतातील सर्वाधिक चर्चित असलेला युद्ध चित्रपट मानला जातो. कारण चित्रपटाची ट्रीटमेंट तशी होती. देशभक्तीवर भरलेला चित्रपट. त्या काळात सर्व मोठ्या स्टार्सनी चित्रपटात काम केलयं. सनी देओलपासून सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, तब्बू आणि पूजा भट्ट.
बड्या स्टार्सनी दिला नकार

पण जे. पी. दत्ता यांना या चित्रपटासाठी सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण सारख्या स्टार्सनाही घ्यायच होतं. त्यांनी संपर्कही साधला होता. पण हे सर्व स्टार तेव्हा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होते. शेवटी नवोदित अक्षय खन्नाला या चित्रपटैत घेण्यात आलं. अक्षयच्या कारकिर्दीतील हा दुसरा चित्रपट होता.

पंतप्रधान प्रभावित झाले

जे.पी. दत्ता यांना 'बॉर्डर' पूर्ण सत्यतेसह मोठ्या लेवलचा बनवायचा होता. त्यामुळे चित्रपट बनवण्यासाठीच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेतली. त्यांना बॉर्डर चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून दाखलवली. ही गोष्ट ऐकुन पंतप्रधान नरसिंह राव प्रभावित झाले आणि म्हणाले, 'हा चित्रपट बनला पाहिजे.'

पंतप्रधान नरसिंहराव म्हणाले की, 'जे.पी. दत्ता यांना बॉर्डर चित्रपट बनवण्यासाठी लष्कराचे पूर्ण सहकार्य मिळेल. बॉर्डर चित्रपटात तुम्हाला दिसणारे सैनिक आणि शस्त्रे खरी आहेत.

'बॉर्डर' मध्ये मुख्य कलाकार वगळले तर अन्य कोणताही अभिनेता सहकलाकार नाही.

सर्व सहकलाकार खरे सैनिक होते. तोफांपासून ते बंदुकींपर्यंत सर्व गोष्टी लष्करातील होत्या.

त्यामुळे बॉर्डरवरील लष्करी वातावरण, सैनिक जीवन या गोष्टी अस्सलतेने सिनेमात उतरल्या.

पुरस्कारांची लयलूट

सनी देओल
सनी देओल

'बॉर्डर' चित्रपट १९९७ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

यामुळे जे. पी. दत्ता यांच्यावर लागलेला फ्लॉप चित्रपटाचा शिक्का पुसून टाकला होता.

पैसा तर मिळालाच पण चित्रपटाला भरपूर पुरस्कारही मिळाले.

'बॉर्डर'ने चार फिल्मफेअर आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकून बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.

जे. पी.ना जीवे मारण्याची धमकी

सुनिल शेट्टी
सुनिल शेट्टी

काही दिवसांनी जे.पी. दत्ता यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.

जे.पी. यांनी पोलीस आयुक्तांजवळ तक्रार केली. त्यांनी २४ तास जे.पी. दत्तांना पोलिस संरक्षण दिलं.

धोका पाहून जे.पी. दत्ता यांना त्यांच्या कुटुंबासह प्रवास करण्याची परवानगी नव्हती.

पुढं जे.पी. दत्ता चित्रपट बनवत राहिले.

त्यांनी 'एलओसी कारगिल', 'रेफ्युजी' आणि 'उमराव जान' सारखे चित्रपट केले.

त्यांचा शेवटचा चित्रपट २०१८ मध्ये 'पलटन' होता. पण जे.पी.

दत्ता आजही 'बॉर्डर' चित्रपटासाठी ओळखले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news