पाथर्डीतील अतिक्रमणांवर पडणार हातोडा, पालिकेची तयारी पूर्ण | पुढारी

पाथर्डीतील अतिक्रमणांवर पडणार हातोडा, पालिकेची तयारी पूर्ण

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा

शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे विद्रुपीकरण झाले असून, या अतिक्रमणाच्या विळख्यातून शहराला बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. पालिका हद्दीतील शेवगाव रस्त्याजवळ असलेली अतिक्रमणे त्वरित काढा, असे आदेश त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले आहेत. या आदेशानंतर पालिका प्रशासनाने ही अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू केली आहे.

Avinash Jadhav : राज ठाकरेंच्या जागी ‘या’ मनसे नेत्याची थेट अयोध्येत धडक!

शेवगाव रस्त्या लगत सध्या असलेल्या अनेक मोकळ्या जागेत काहींनी पत्र्याच्या टपर्‍या टाकून अतिक्रमणे केली आहेत. ज्या जागेत ही अतिक्रमणे उभारण्यात आली, ती जागा नेमकी पालिकेची की, सार्वजनिक बांधकाम विभागाची या वादात ही अतिक्रमणे उभी राहिली असून, या शिवाय ज्यांनी ही अतिक्रमणे केली, ते कोणत्याही परिस्थितीत आपली अतिक्रमणे काढत नसून कारवाई करूनही अतिक्रमणे काढली की, परत दुसर्‍या दिवशी अतिक्रमण उभी राहत आहेत.

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असल्यास राऊतांनी धूणीभांडी करायची का? : गजानन काळे

यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे अनेकांनी मोठाल्या गुतूंवणूका करत या रस्त्या लगत प्लॉट घेतले, तर काहींनी घरे सुद्धा बांधली आहेत. मात्र, अतिक्रमण झाल्याने या ठिकाणी मालमत्ता घेणार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. हवे तिथे मोकळी जागा मिळाल्यास दिवसा अतिक्रमण होत आहे. जागा कोणाची याच्यावरून शासकीय जागेचा वाद एकमेकांकडे बोट दाखविला जातो. तोपर्यंत अतिक्रमण करणारे त्या जागेत अतिक्रमण करून बसतात.

नगर : वृध्द दाम्पत्याच्या निघृण खून प्रकरणी तीन गुन्हेगारांना अटक

या अतिक्रमाणांसंदर्भात काहींनी थेट जिल्हा अधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे तक्रारी केल्या. यानंतर त्यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले असून, या संदर्भात यांनी पोलिसांकडे अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. लवकरच अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनाच्या पातळीवर कारवाई सुरू होणार आहे.

अतिक्रमणे करायची अन् काढण्यासाठी पैसे उकळायचे

शहरातील शेवगाव रस्त्तावरील नवीन बसस्थानकासमोर सध्या जोरात अतिक्रमण सुरू असून, अनेकांनी दुकाने थाटली आहेत. अतिक्रमणामुळे सर्वसामान्याला रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. अतिक्रमणे करायची, ती काढण्यासाठी मोठी रक्कम घ्यायची, असाही गोरखधंदा काहींनी सुरू केला आहे.

Back to top button