नाशिक :सिडकोत नियंत्रण सुटल्याने दुचाकी घुसली एटीएममध्ये | पुढारी

नाशिक :सिडकोत नियंत्रण सुटल्याने दुचाकी घुसली एटीएममध्ये

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सावतानगर येथील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या तरुणीचा गाडीवरील ताबा सुटल्याने तिची मोपेड थेट एटीएममध्ये घुसली. यात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. तिला प्राथमिक उपचारासाठी जवळच्याच एका दवाखान्यात दाखल केले आहे. ही घटना बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गौरी प्रदीप सैदाणे (18 रा. खांडे मळा, सावतानगर, सिडको) असे जखमी मुलीचे नाव असून, ती सकाळी 9.30च्या सुमारास घरातून निघाली होती. सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यास गेली होती. पैसे काढून बाहेर आल्यानंतर तिने दुचाकी सुरू केली असता, तिचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी थेट समोरच असलेल्या एटीएममध्ये घुसली. या घटनेची माहिती मिळताच, अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेथे दाखल झाले. तसेच पोलिसांनी ही माहिती एसबीआय बँकेला कळविल्याने बँकेचे कर्मचारीदेखील त्या ठिकाणी दाखल झाले.

हेही वाचा:

Back to top button