‘आदिपुरुष’चे बजेट 500 कोटींचे! | पुढारी

‘आदिपुरुष’चे बजेट 500 कोटींचे!

दक्षिणेतील सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभासचा आगामी ‘आदिपुरुष’ आतापासूनच चर्चेत आहे. विशेष म्हणजे प्रभासचा हा चित्रपट त्याच्या ‘बाहुबली’ फ्रँचाईजीपेक्षाही अधिक बजेटमध्ये बनवला जात आहे. एका वृत्तानुसार या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपयांचे आहे. हा प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट बनू शकतो. ‘बाहुबली-1’ 180 कोटीत व ‘बाहुबली-2’ 250 कोटी रुपयांमध्ये बनला होता. आता अलीकडेच एका मुलाखतीत निर्माते भूषण कुमार यांनी ‘आदिपुरुष’च्या बजेटच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित असेल व त्याचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. क्रिती सेनन, सैफ अली खान यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Back to top button