जेव्हा करिनाला राग येतो | पुढारी

जेव्हा करिनाला राग येतो

नवी दिल्ली

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सातत्याने ट्रोलर्सचे लक्ष्य ठरत असते. मात्र, याकडे करिना नेहमीच दुर्लक्ष करत असते. पण यावेळी तिने जशास तसे ठोस प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वी लुकवरून करिनाला ‘बुढ्ढी’ असे म्हटले गेले. यामुळे करिनाचा शांत राहण्याचा संयम सुटला आणि तिने ट्रोल करणार्‍यांना चांगलेच खडसावले.

काही दिवसांपूर्वी झालेल्या करण जोहरच्या कार्यक्रमात करिनाने सिल्व्हर ड्रेस परिधान केला होता. या कार्यक्रमाला करिनाशिवाय अन्य काही अभिनेत्रीही गेल्या होत्या. यावेळी अमृताने गोल्डन अँड ब्लॅक, तर मलाईकाने ग्रीन आणि पिंक कलरचा आऊटफिट परिधान केला होता. सोशल मीडियावर कार्यक्रमातील फोटो वेगाने व्हायरल झाले. मात्र, नेहमीसारखे यावेळीही ट्रोलर्सनी करिनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी करिनाने शांत न राहता ट्रोलर्सना चांगलेच खडसावत त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.

 

Back to top button