Swatantra Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक रिलीज

Swatantra Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक रिलीज
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक रिलीज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज, २८ मे, थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची १३९ वी जयंती. या औचित्याने चित्रपटाच्या निर्मात्यांनी विनायक दामोदर सावरकरांची दमदार व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रणदीप हुडाचा फर्स्ट लुक (Swatantra Veer Savarkar) रिलीज केला आहे. पोस्टरवर 'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' असे लिहिलं आहे. या चित्रपटाची ऑगस्टपासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. (Swatantra Veer Savarkar)

चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी शेअर केले की, "जेव्हा हर्षद मेहता, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांचे चित्रपट ट्रेंडमध्ये असताना मला वीर सावरकरांच्या जीवनाची कथा सांगण्यात जास्त रस वाटला. कारण ते भारताचे पहिले डायनॅमिक हिरो होते.

या चित्रपटाद्वारे मला, केवळ एक चित्रपट निर्माता म्हणून नव्हे, तर एक भारतीय म्हणून, सावरकरांच्या संघर्षाची वस्तूस्थिती जगाला सांगायची आहे. स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा धाडसी लढा, इंग्रजांना घाबरवणारे त्यांचे निर्भिड व्यक्तिमत्त्व आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची हिंदुत्वासाठी असलेली बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे. सर्वांनी गैरसमज करून घेतलेल्या या हिरोला आपल्याला आता समजून घेण्याची वेळ आली आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांना कधीच मिळालं नाही. म्हणूनच सावरकरांना भारत रत्‍न आणि नोबेल पुरस्‍कार दिला जावे, असं मी निवेदन करतो."

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले की, "रणदीपने एक अभिनेता म्हणून आपले कौशल्य वारंवार दाखवले आहे. त्याने साकारलेल्या पात्रात तो बदलू शकतो हे दाखवून दिले आहे; परंतु सावरकरांबाबतीत, स्वातंत्र्यसैनिकांसोबत त्यांच्या विलक्षण साम्यामुळे आणखी एक उमेद मिळाली. मी इतिहास प्रेमी आहे आज्या नेत्याची कथा सांगायलाच हवी, त्याची कथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सिनेमॅटिक विशेषाधिकार मिळाल्याबद्दल मी उत्सुक आहे."

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्‍हणाले की, "लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळे आवृत्त्या असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटातील सावरकरांच्या व्यक्तिरेखेपेक्षा काही फरक पडणार नाही. सावरकर स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही.

अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला, "भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात थाेर नायकांपैकी एकाला हा सलाम आहे. मला आशा आहे की, मी एका खऱ्या क्रांतिकारकाचे योगदानाचे आव्हान पेलू शकेन. त्यांची खरी कहाणी जनतेला सांगू शकेन."

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओजद्वारे स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट प्रस्तुत केले जात आहे. निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी पेलली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news