शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले | पुढारी

शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले आहेत. घरचं इतकं मोठं प्रकरण घडलं आहे. शमिता शेट्टी हिला त्याची पर्वा नाही.

अधिक वाचा – 

शिल्पा शेट्‍टीने तिला बिग बॉसच्या घरात जाण्यापासून रोखलं होतं. पण, तरीही शमिताने ऐकलं नाही. तिने अखेर बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलीच.

अधिक वाचा – 

बिग बॉस १५ म्हणजे बिग बॉस ओटीटी हा शो ‘वूट’वर सुरू झाला आहे. करण जोहर सध्या हा शो होस्ट करत आहे. शिल्पाच्या बहिणीने स्पर्धक म्हणून शोमध्ये एन्ट्री केली आहे. पण, हे पाहून प्रेक्षक भडकले आहेत. पण, आता तिने स्वतः या मागचे कारण सांगितले आहे.

shamita shetty
शमिता शेट्टी

… म्हणून शोमध्ये सहभागी झाले

याबाबत शमिता म्हणाली की, राज कुंद्रा प्रकरणामुळे तिच्या मनात दोन विचार सुरू होते. या शो मध्ये जावे की नाही, असा विचार मनात घोळत होता. पण, येणारा काळ चांगला असो वा वाईट असो. आपण श्वास घेणं तरी सोडत नाही. मग, आपल्या कामातही सातत्य असावं.

अधिक वाचा – 

बिग बॉसची ऑफर मला खूप पूर्वी आली होती. त्यावेळी मी सहभागी होईन, असे वचन दिले होते. त्यानंतर राज कुंद्रा वाद निर्माण झाला. मला वाटले, मी या शोमध्ये जाणं कदाचित योग्य ठरणार नाही; पण मी वचन दिले होते.

ती शोमध्ये आल्यानंतर करण जोहरने तिला तिचे कनेक्शन निवडण्यास सांगितले होते. तिने अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता करण नाथ यांना तिचे कनेक्शन निवडण्याचे ठरवले होते. राकेश-करण यांच्यात टास्क झाला.

राकेश शमिताला प्रभावित करण्यात यशस्वी झाला. आता ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये ती आणि राकेश जोडी बनली आहे.

शिल्पाचा पती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले. लोकांना तिची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन तिने केले होते.

हेही वाचलं का?

Back to top button