kiran gaikwad
kiran gaikwad

देवमाणूस : किरण गायकवाड याचा नवा स्टाईल फंडा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

देवमाणूस या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात कंगणी बाबा – नटवर सिंगच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला. किरण गायकवाड ही भूमिका अगदी चोख बजावतोय. सध्या मालिकेचं कथानक हे एका रंजक वळणावर आलं आहे. किरणच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांनी मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला देखील अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. अभिनेता किरण गायकवाड हा सोशल मीडियावरदेखील सक्रिय आहे.

ऑनस्क्रीन अजितकुमारची भूमिका साकारणारा किरण खऱ्या आयुष्यात खूपच जास्त स्टायलिश आहे. वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटोज किरण नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतंच त्याने एका अनोख्या आऊटफिटमधील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. काहींनी कंगणी बाबाच्या स्टाईल फंडाचा कौतुक केलं तर काहींनी चक्क भूलभुलैयामधील कार्तिक आर्यनची उपमा किरणला दिली आहे. कंगणी बाबांचा हा स्टाईल फंडा व्हायरल होताना दिसतोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news