777 Charlie : केजीएफनंतर 777 चार्ली, बॉलिवूडसाठी मोठा धक्का? | पुढारी

777 Charlie : केजीएफनंतर 777 चार्ली, बॉलिवूडसाठी मोठा धक्का?

पुढारी ऑनलाईन डेस्क

रक्षित शेट्टी यांच्या 777 चार्लीच्या (777 Charlie) ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. सर्व भाषांमधील या व्हिडिओला ३० दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दिग्दर्शक किरणराजचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. हा चित्रपट १० जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे कथानक धर्म (रक्षित) आणि त्याच्या चार्ली नावाच्या कुत्र्याभोवती फिरते. किरणराजने चित्रपटाचे नाव देण्यामागील आणखी एक मनोरंजक पैलू उघड केले आहे. (777 Charlie)

777 चार्ली बॉलिवूडसाठी का मानला जात आहे धक्का?

KGF 2 मुळात कन्‍नड चित्रपट आहे. या चित्रपटाने यशला कन्‍नड चित्रपटांचा सुपरस्‍टार बनवलं आहे. यश आणि किच्‍चा सुदीप नंतर कन्‍नड चित्रपट इंडस्‍ट्रीमध्ये मोठं नाव म्हणजे रक्ष‍ित शेट्टीचेदेखील आहे. रक्षित शेट्टीच्या ‘777 चार्ली’ च्या ट्रेलरने याआधीच धुमाकूळ घातला आहे.

ज्या प्रकारे ‘KGF 2’ ने हिंदी तिकीट खिडकीवर बंपर कमाई केली आहे. अशा स्थितीत रक्षितच्या ‘777 चार्ली’ला हिंदी चित्रपटांसाठी तगडी स्पर्धा मानले जात आहे. विशेष म्हणजे, रक्षित शेट्टीचा ‘777 चार्ली’ देखील ‘KGF 2’ च्या धर्तीवर संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

777 चार्ली नाव कसं पडलं?

दिग्दर्शक म्हणतो- मी चार्ली चॅप्लिनचा कट्टर चाहता आहे. त्याचे चित्रपट पाहून मला समजले की, त्याचे सिनेमातील दृश्ये आकर्षित करणारी आहेत. मी माझ्या आधीच्या कामात याचा प्रयोग केला आहे. “चार्लीचा चाहता असल्याने, मी माझ्या चित्रांमध्ये त्याचे नाव आणि उपस्थिती निश्चित केली आहे. किरणराज यांनी 777 क्रमांकाचे महत्त्व देखील सांगितले.

भारतीय अंकशास्त्रानुसार 7 हे प्रेम, मैत्री आणि बंधनाचे प्रतीक आहे. पश्चिम मध्ये, 777 क्रमांकाला देवदूताचा स्पर्श आहे. जगात सात आश्चर्ये आहेत. त्याचप्रमाणे चार्लीचे ७ आश्चर्यकारक क्षण या चित्रपटात आहेत. हा माझा भाग्यवान क्रमांक देखील आहे. त्यामुळे 777 चार्ली हे नाव पुढे आले.

दरम्यान, तमिळ चित्रपट निर्माता कार्तिक सुब्बाराज या चित्रपटाच्या कथेमुळे खूप प्रभावित झाले आहेत. त्याने चित्रपट पाहिल्यानंतर तमिळ व्हर्जनमध्य़े चित्रपट वितरित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मल्य़ाळम व्हर्जनसाठी 777 चार्लीचे मिक्सिंग इंजीनियर एमआर राजा कृष्णन होते. त्यांनी मल्याळम व्हर्जनमध्ये 777 चार्लीसाठी स्वत: पेट लवर पृथ्वीराजशी संपर्क करण्य़ाचा प्रस्ताव ठेवला होता.

रक्षित शेट्टीचा ‘777 चार्ली’ पाच भाषांमध्ये रिलीज होण्यास तयार आहे. कॉमेडी-ड्रामा हिंदी व्हर्जनला रिलीज करण्यासाठी युएफओ पुढे आली आहे. 777 चार्ली हा चित्रपट मुळात कन्नड भाषेत आहे. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन, दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज आणि अभिनेता राणा दग्गुबाती क्रमशः मल्याळम, तमिळ आणि तेलुगुमध्ये चित्रपट रिलीज केला आहे. धनुष आणि साई पल्लवी यासारख्या दिग्गज स्टार्सनीदेखील चित्रपटाच्या ट्रेलरचं समर्थन केलं आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेलरच्या रिलीजनंतर 777 चार्ली चर्चेत राहिलं होतं.

जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट

पुन्हा ‘केजीएफ’च्या कमाईकडे येऊ. ३२ दिवसांनंतरही हा चित्रपट तिकिट खिडकीवर कायम आहे, हे कौतुकास्पद आहे. वर्ल्‍डवाइड कमाईच्या बाबतीत एसएस राजामौलीच्या RRR ला मागे टाकून क्रमांक-३ वर पोहोचला आहे. ग्‍लोबल बॉक्‍स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये क्रमांक-१ च्या खुर्चीवर आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘बाहुबली २- द कन्‍क्‍लूजन’ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakshit Shetty (@rakshitshetty)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakshit Shetty (@rakshitshetty)

Back to top button