

पुढारी ऑनलाईन
करिश्मा कपूर आणि करिना कपूर या बहिणींनीच बॉलीवूडमध्ये 'झीरो फिगर'ची संकल्पना आणली होती. दोन मुलांची आई बनलेली करिना अजूनही सुंदर दिसते याचे कारण म्हणजे तिचा फिटनेस. योग्य आहार आणि व्यायाम या गोष्टींना ती प्राधान्य देते. मात्र, कधी कधी 'चिटिंग डे'ही केला जात असतो. सध्या दार्जिलिंगमध्ये शूटिंग करीत असलेल्या करिनानेही तिथे काही चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेतला आणि त्याची छायाचित्रेही सोशल मीडियात शेअर केली. इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओत दिसते की ती अभिनेता विजय वर्मा आणि मेकअप आर्टिस्ट पॉम्पी हॅन्स यांच्यासमवेत सकाळच्या थंड हवेत गरमागरम नाश्ता करीत आहे. यावेळी ती फ्रेंज फ्राईज खात होती. तिने लिहिले आहे की 'थंडीत चाट मसाला व लाल तिखट भुरभुरलेले गरमागरम फ्रेंच फ्राईज खाण्याची लज्जत औरच आहे!'