देवमाणूस : सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या? | पुढारी

देवमाणूस : सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या?

पुढारी ऑनलाईन : देवमाणूस फेम सरू आजी हिला शिव्या शिकवल्या कुणी? तुम्हाला तिच्याविषयी माहिती आहे का? तर मग जाणून घेऊया. सरू आजी विषयी.

अधिक वाचा – 

मुडदा बसवला त्याचा, त्याच्या पालखीचा धूर बसवला त्याचा…अशी शिव्याशाप देणाऱ्या आजीला इतक्या शिव्या, म्हणी म्हणायला, येतात कुठून? डॉक्टरची फजिती करणारी आजी विषयी ही माहिती वाचायला तुम्हाला नक्की आवडेल.

आजीची दगडूशेठ गणपतीवर खूप श्रध्दा आहे. परमेश्वरामुळे शक्ती येते, ताकद येते, अशी भावना आजीने पुढारी ऑनलाईनशी बोलताना सांगितली.

अधिक वाचा – 

अभिनय क्षेत्रात आजी कशी आली? याविषयी आजी म्हणते- लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्या नोकरी करत असताना त्यांचे साहेब देखील अभिनय क्षेत्रातील होते. त्यांनी एक नाटक बसवलं होतं.

पुढे हळूहळू अनेक नाटके केली. नंतर स्पर्धेच्या नाटकांत भाग घेतला. आवड असल्यामुळे अभिनयात यायचं ठरवलं. क्राईम डायरी सारख्या मालिकांमध्ये छोट्या -छोट्या भूमिका मिळवता मिळवता डॉक्टरची मालिका मिळाली.

लागीरं झालं जी, मिसेस मुख्यमंत्री आणि नंतर देवमाणूस अशा ‘झी’च्या तीन मालिका केल्या. कुठलेही काम नाकारलं नाही.
म्हणी आणि शिव्या शिकवल्या कुणी ?

अधिक वाचा – 

पूर्वीच्या जुन्या म्हणी आजीला माहिती होत्या. पण, सरसकट शिव्या देणं, ही स्क्रिप्टची मागणी होती. लेखकाने लिहिलेल्या म्हणी मालिकेत सीनवेळी डायलॉग म्हणून बोलवून दाखवंणं. हेचं मोठं कौशल्य होतं. यासाठी म्हणी पाठांतर कराव्या लागल्या, असं आजी म्हणते.

मकरंद गोसावी यांनी माझी निवड केली. आधी मालिकांमध्ये काम केलं होतं. माझा अभिनय पाहून त्यांनी मला आताच्या मालिकेत संधी दिली. असंही आजी म्हणते.

जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, पोशिंदा अशा चित्रपटांमध्ये तसेच वेब सीरिज, शॉर्ट फिल्म्समध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.

रिअल लाईमध्येही स्वभावाने कडक

आजी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकदम रोखठोक आहे. स्वभावानेही ती कडक आहेत. आजीला पहिल्यापासून संगीताची आवड आहे.

डान्स करायलाही आवडतं. जेव्हा क्राईम डायरीमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली. तेव्हा सरू आजीला स्वर्ग दिसला होता. कारण, तिला नेहमी वाटायचं की, आपण टिव्हीवर दिसावं. तिच्यासाठी हे सर्व स्वप्नवत होतं.

तरुणपणी त्या सर्व्हिस करायच्या. पण, इथंवर येण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागले. मुलांनीही तिला साथ दिली. मग कामे मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली. पण, आता रस्त्याने जात असताना लोक आजी म्हणू हाक मारतात, दाद देतात, याचा अमाप आनंद होतो.

आजीने सलमान खानसोबत दबंग चित्रपटात काम केलंय. याविषयी ती म्हणाली की, मला बोलावलं आणि तुम्हाला सलमानसोबत काम करायचं आहे, असं सांगितलं. यावर मी दोन दिवस झोपू शकले नव्हते. इतका आनंद मला झाला होता.

हे देखील वाचा – 

 पाहा व्हिडिओ – देवमाणूस मधील फेमस सरू आज्जींबरोबर म्हणीं आणि शिव्यांची धम्माल ऐका ! 

Back to top button