मौनी रॉयच्या छायाचित्रांवर चाहत्यांच्या उड्या | पुढारी

मौनी रॉयच्या छायाचित्रांवर चाहत्यांच्या उड्या

मुंबई :

अभिनेत्री मौनी रॉय सध्या एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज बनली आहे. याशिवाय ती रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, सध्या ही अभिनेत्री व्हेकेशनवर आहे. मौनी रॉय सध्या पती सूरज नांबियारसोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे. तिने या प्रसंगाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
मौनी रॉयने अत्यंत गाजलेली टीव्ही मालिका नागिनमधून प्रचंड यश मिळवत बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करून चर्चेत राहात असते. तिने नुकतीच उन्हाळी सुट्टीवरची काही छायाचित्रे शेअर केली असून, ती वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये मौनीने ब्लॅक सनग्लास व पांढरे थाई स्लिट आऊनफिट परिधान केले आहे. यामध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. यामुळे हे फोटो चाहत्यांकडून वेगाने शेअर करण्यात येत आहेत.

Back to top button