

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान (Imran Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्यात बऱ्याच दिवसांपासून सर्व काही सुरळीत चालले नाहीये. या दोघांमधील मतभेदाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. आता ताज्या रिपोर्टनुसार, इम्रान आणि अवंतिकाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
इम्रान खान (Imran Khan) आणि अवंतिका मलिक यांनी 2011 मध्ये एकमेकांना जीवसाथी बनवत लग्न बंधनात अडकले. त्यावेळी त्यांच्या विविहाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण 2019 पासून या जोडप्यामध्ये मतभेद आणि वाद सुरू असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, अवंतिकाला या नात्याला आणखी एक संधी द्यायची होती, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यामुळे आता ते दोघांनी वेगळे होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. मात्र, न्यायालयात तलाकचा अर्ज दाखल झालेला नसल्याचेही समोर आले आहे.
इम्रान खान (Imran Khan) आणि अवंतिका मलिक यांच्यात त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, जवळच्या नातेवाईकांनी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. आता दोघेही एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात. या जोडप्याला एक मुलगी आहे, जी सात वर्षांची आहे.
इम्रानच्या (Imran Khan) करिअरबद्दल बोलायचे झाले तर, 2008 मध्ये आलेल्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतरही तो अनेक चित्रपटांचा भाग बनला, पण त्याला फारसे यश मिळू शकले नाही.
गेल्या वर्षी इम्रान खानचा मामा आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने पत्नी किरण रावला घटस्फोट दिला होता. दोघांनी 15 वर्षांचे नाते संपवत एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमिर आणि किरणच्या या निर्णयाने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. या दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव आझाद आहे. त्याचबरोबर घटस्फोटानंतरही दोघेही चांगले मित्र असल्याचे दोघांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते.