Shehnaaz Kaur Gill : अभिनेत्री शहनाजने व्यायामाशिवाय तब्बल १२ किलो वजन घटवलं!

पुढारी ऑनलाईन: बिग बॉस १३ ची सर्वात लोकप्रिय स्पर्धक आणि शहनाज गिल ( Shehnaaz Kaur Gill ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून, ती आपले फोटो शेअर करत असते. शहनाजने गेल्या सहा महिन्यात १२ किलो वजन कमी केल्याने फिट ॲन्ड फाईन दिसतेय.
बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाचे मागील वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यानंतर शहनाज गिलला नैराश्याने ग्रासले हाेते. सिद्धार्थच्या अकाली मृत्यूमुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. यातून स्वत: ला सावरण्यासाठी तिने कामात बिझी राहायचे ठरविले. नुकतेच तिने ‘होंसला राख’ चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवला. सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली म्हणून तिने ‘तू ये है हे’ गाने रिलीज केले. आता तिच्या इंन्टाग्रामवर नवनवीन फोटोशूट पाहायला मिळत आहे.
नुकतेच शहनाजने ( Shehnaaz Kaur Gill ) तिच्या इंन्टाग्रामवर पर्पल रंगाच्या वनपीसमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोत वाऱ्यासोबतच्या तिच्या हॉटपोझने चारचॉद लावले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Paint the Sky. Make it yours’ . लिहिलं आहे. तर व्हिडीओमध्ये तिने #shehnaazgill #flylagdi अशी टॅगदेखील दिले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह दिग्दर्शकांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात दिग्दर्शक परवेझ नुमरी यांनी ‘Beautiful as always ❤️❤️❤️❤️❤️’. असे म्हटले आहे. तर नेटकऱ्यांनी ‘Looking so gorgeous 😍😍’, ‘Looking so classy’, ‘Hot shine’, ‘Our Fly Girl 🔥😍’.’ #Shehnaaz Gill Keep Shining Always’, ‘Amazing Reel 😍 Colourfull Beauty’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. या फोटोशूटमध्ये शहनाज ग्लॅमरससोबत फिट ॲन्ड फाईन दिसतेय.
नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत शहनाजने गेल्या सहा महिन्यात तब्बल १२ किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. तिने कोणत्याही व्यायामाशिवाय फक्त डाएट नियंत्रणात ठेवून हे केल्याचा खुलासा केला आहे. यात तिने शाकाहारी जेवणात डाळ, चवळी, सब्जी आणि रोटी असा साधा डाएट फॉलो केला आहे. रात्रीच्या जेवणात एक ग्लास दूधाचे सेवन केले. आहारातून मासांहार चॉकलेट, आईस्क्रिम, लोणी आणि तेलाचा वापर कमी केल्याचे तिने म्हटलं आहे.
यापूर्वी तिचे वजन ६७ किलो होते, परंतु, सध्या डाएट पॅन करून ५५ किलोपर्यन्त म्हणजे, १२ किलो कमी केल्याचे म्हटले आहे. यासोबत ज्या चाहत्यांना स्वत: चे वजन कमी करायचे आहे, त्यांना भरपूर पाणी पिण्याचा सल्लादेखील दिला आहे. शहनाजचे इंन्स्टाग्रामवर ११.४ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हेही वाचलंत का?
- Gunaratna Sadavarte : सदावर्तेंकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघ संघटने’ची स्थापना, एसटी बँकेच्या निवडणुकीतून राजकारणात घेणार एन्ट्री
- Sonakshi Sinha engagement : सोनाक्षी सिन्हानं दिली गुड न्यूज, मात्र पार्टनरचा चेहरा लपवला
- वाशीम : देव दर्शन करून परतताना काळाचा घाला; उभ्या ट्रेलरला कारची धडक, २ ठार, ५ गंभीर जखमी
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram