दहावी, बारावीचा निकाल जूनमध्येच जाहीर होणार | पुढारी

दहावी, बारावीचा निकाल जूनमध्येच जाहीर होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बारावीचा निकाल जूनच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजेच 10 जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल जूनच्या तिसर्‍या आठवड्यात म्हणजेच 20 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

Share Market Crash : सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका!

राज्य मंडळाने यंदा परीक्षा घेण्यावर ठाम राहत दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या. काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदलदेखील करावे लागले. त्यामुळे दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियाही सुरू झाली असून, काही विषयांची उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात आहे.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, २४ तासांत ३,५४५ नवे रुग्ण, २७ मृत्यू

दहावी, बारावी निकालासंदर्भात रोज फॉलोअप घेत आहे. यंदा 10 जूनपर्यंत बारावीचा, तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल लावण्याचे नियोजन आहे. निकालाच्या अधिकृत तारखा योग्यवेळी जाहीर करू. परंतु, यंदा वेळेतच निकाल लावण्यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

हेही वाचा

कोल्हापूर : संभाजीराजे १२ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार?

मुंबई : जयंत पाटील यांच्यामुळे संभाजी भिडेंना क्‍लीन चिट : प्रकाश आंबेडकर

यंदा १० दिवसांआधीच मान्सून दाखल होणार!

Back to top button