Myra vaikul : मायराचा 'आज ब्लू है पानी'वर क्यूट डान्स | पुढारी

Myra vaikul : मायराचा 'आज ब्लू है पानी'वर क्यूट डान्स

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका चाहत्याच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत यश म्हणजे, श्रेयस तळपदे आणि नेहा म्हणजे, प्रार्थना बेहेरे यांची जोडी चाहत्यांना खूपच आवडली आहे. विशेष म्हणजे, मालिकेतील परी म्हणजे, मायरा वायकुळ (Myra vaikul ) ही चाहत्यांसाठी खास आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मायरा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या मायराचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मायराने (Myra vaikul ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलाजवळ डान्स करताना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने गायक यो यो हनी सिंग याच्या ‘आज ब्लू है पानी पानी’ या गाण्यावर हटके डान्स केला आहे. कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने मायरा आई- वडिलांसोबत निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Summer vibes 🔥’. असे म्हटले आहे. यावरून ती सध्या स्विमिंग पूलाच्या पाण्यात मनमुराद पोहोचण्याचा आनंद घेण्यास सज्ज असल्याचे दिसते. यातील खास म्हणजे, परिने घातलेला लाल रंगाचा ड्रेसचे आकर्षण चाहत्यांना लागले. यावेळच्या लाल रंगाचा शार्ट टूपीसमध्ये ती खूपच स्टायलिश अंदाजात दिसत होती. तर मायराने यावेळी केसांची पोनी आणि पायात पांढऱ्या रंगाचे बूट परिधान केले आहेत. या व्हिडिओच्या शेवटी जान्, संपताच ती स्विमिंग पूलाच्या बाजूने पळताना दिसत आहे. परीचा हा हटके डान्स चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाउस पाडला आहे. यात एका युजर्सने मायराचे भरभरून कौतुक करताना किती कित्ती ते नखरे 😍❤️, खूप खूप प्रेम mayra 😘,अग बाई पिंटी, Red velvet, O ho cutipie😍😍🔥🔥❤️❤️, Cutie❤️😍, So cute dance myra , अग बाई किती गोड आमची मयरा उर्फ परी ❣️😘तर दुसऱ्या एका युजर्सने Pretty and cute ❤️❤️, Ohh my god…cutie^😍😍😍, OMG, रश्मी देसाई की छोटी कार्बन कॉपी😍😍😍, चिटूकली. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर याच दरम्यान काही युजर्सनी आपली प्रतिक्रिया देताना मुलावर काय संस्कार केलेत?, या वयात असा ड्रेस तिने कशाला घातलाय?, मायराचा अभिनय खूप छान आहे पंरतु, बालपण हरवत चालले आहे, तिचं बालपण जपा असा सल्ला देखील चाहत्यांनी दिला आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

मायराच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक व्हिडिओज आणि फोटो पाहायला मिळतात. याआधी ती चंद्रामुखी चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्यावर थिरकली होती. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो शेअर करत असते. या व्हिडिओला आतापर्यत ५१ हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. मायराची छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका खूपच गाजत आहे. तर नुकतेच ती कोलीवूड प्रॉडक्शन प्रस्तुत ‘आई’ या गाण्यात दिसली होती. या गाण्याचे बोल आई विना मला करमत नाही, असे आहेत. यात ती शाळेच्या गणवेशात दिसतेय. गायिका दिया वाडकर हिने या गाण्याला आवाज दिला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button