

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने ( Anil Kapoor ) आपल्या अभिनयासह दमदार ॲक्शन, कॉमेडी, रोमान्सने भरलेले अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटाची आजही चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अनिल कपूरने नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले अपडेटस देत असतो. सध्या त्याने शेअर केलेल्या ब्लॅक ॲन्ड व्हाईट थ्रोबॅक फोटोंने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
अभिनेता अनिल कपूरने ( Anil Kapoor ) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक ॲन्ड व्हाईट एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कृष्णा राज कपूर, नीतू कपूर आणि सुनीता कपूर तिघेजणी दिसत आहेत. यावेळी तिघांच्याही हातात खाण्याच्या प्लेट्स असून एका बुफे पार्टीमध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत. यातील खास म्हणजे, अनिल कपूरने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनिलने 'श्रीमती कृष्णा राज कपूर, श्रीमती नीतू ऋषी कपूर आणि माझी पत्नी सुनीता ?. थ्रोबॅक मेमरीज'. असे म्हटलं आहे.
यानंतर नीतू कपूरनेही हा फोटो रिट्विट करून जुन्या आठणींना उजाळा दिला आहे. नीतूने हा फोटोच्या कॅप्शनमध्ये 'आई, सुनीता कपूर आणि मी.' असे लिहिले आहे. यासोबत त्यांनी हार्ट इमोजीही शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मुलगीरिया कपूरने या फोटोचे कौतुक करत आईचा चेहरा बिल्कुल… असे म्हणत फायरचा इमोजी शेअर केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने या फोटोला कॅप्शन देताना 'कपूर कुंटुबीयजेवणाचे शौकिन आहेत' असे म्हटलं आहे.
याच दरम्यान एका नेटकऱ्याने 'सुनीताचा चेहरा तिची मोठी मुलगी आणि रियाची बहीण सोनम कपूर हिच्यासारखा दिसतो' असे म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने थ्रोबॅक फोटोचे कौतुक केले आहे. काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.
नीतू कपूर आणि सुनीता कपूर गेल्या अनेक काळापासून चांगल्या एकमेंकीच्या मैत्रिणी आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि सोनम कपूरच्या 'सावरिया' चित्रपटातून दोघांनी पहिल्यांदा डेब्यू केले होते.
हेही वाचलंत का?