पुणे : बावडा येथे एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन | पुढारी

पुणे : बावडा येथे एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन

बावडा : पुढारी वृत्तसेवा : बावडा (ता. इंदापूर ) येथे एकाच दिवशी पती व पत्नी यांचे निधन होण्याची दुर्देवी घटना शनिवारी (दि. ३०) घडली. हनुमंत यशवंत कांबळे (वय ८२) व हवई हनुमंत कांबळे (वय ७७ ) अशी या पती-पत्नीची नावे आहेत.

पत्नी हवई हनुमंत कांबळे यांचे पहाटे ४ च्या सुमारास निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास हनुमंत यशवंत कांबळे यांचे निधन झाले. हनुमंत कांबळे हे वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या पाठीमागे २ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एकाच दिवशी पती-पत्नी यांचे निधन झाल्याने बावडा ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button