हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पीडितेच्या तक्रारावरुन संशयित आराेपी पांडुरंग संभाजी कल्याणकर (वय २२ रा. कंजारा, ता. औंढा ) याच्याविराेधात कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याणकर याचे एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीचे फोटो काढले. फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी पांडुरंग कल्याणकरविरुद्ध तक्रार दाखल केली. सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, उपनिरीक्षक के. पी. सोनुळे यांच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.