Tarsame Singh Saini : ‘नाचेंगे सारी रात’ फेम गायक तरसेम सिंह सैनी यांचे निधन | पुढारी

Tarsame Singh Saini : ‘नाचेंगे सारी रात’ फेम गायक तरसेम सिंह सैनी यांचे निधन

पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध पॉप गायक तरसेम सिंह सैनी ( Tarsame Singh Saini ) म्हणजेच ​​’ताज’ यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी लंडन येथे निधन झाले आहे. मागील २ वर्षांपासून ते हर्निया आजाराने त्रस्त होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तरसेम सिंह सैनी याच्या निधनाने चित्रपट आणि संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. तर सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वीच तरसेम सिंह ( Tarsame Singh Saini ) याना हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समजले होते. परंतु, मध्यंतरी सर्वत्र कोरोना महामारी आली आणि त्यांची ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. यामुळे त्यांची प्रकृती खालावून ते कोमात गेले होते. यावर्षी मार्च महिन्यात ते कोमातून बाहेर आले आणि त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. याच दरम्यान त्यांनी २३ मार्च रोजी चाहत्याचे आभार मानणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपरचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथेच त्यांचे निधन झाले.

या निधनाची माहिती सोशल मीडियावर पसरताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी दु:ख व्यक्त करत त्यांन श्रद्धांजली वाहिली. यात गायक बल्ली सागू यांनी तरसेम सिंह सैनी याच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर करून ‘RIP भाई, तुमची खूप आठवण येईल.’ असे म्हटले आहे. अमाल मलिकने ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. चित्रपट निर्माते गुरिंदर चढ्ढा यांनी इंस्टाग्रामवर तरसेम सिंह याच्यासोबतचाएक फोटो शेअर करत खूपच दुख होत असल्याचे म्हटले आहे.

ताज यांच्या निधनाची माहिती मिळताच प्रसिद्ध गायक मिका सिंगने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने ताज स्टिरिओ नेशनने आपल्या सुंदर आठवणींसोबत दुःखात सोडलं आहे. त्याला नुकतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तो कोमात गेला. मी त्याची लाल लाल बुलियन, नाचंगे सारी रात या सारख्या हिट गाणी ऐकत मोठा झालो आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’

ताज यांनी ८० च्या दशकात क्रॉस-कल्चरल आशियाई संगीताने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘हिट द डेक’ या गाण्याने ते प्रकाश झोतात आले. ‘नाचेंगे सारी रात, गल्लन गोरियां आणि प्यार हो गया’ सारख्या गाण्यांना आपल्या सुमधूर आवाज दिला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button