Kangana Ranaut : अजय देवगण- सुदीपच्या हिंदी वादात कंगनाची उडी, ‘संस्कृत’ला राष्ट्रभाषा करण्याची मागणी | पुढारी

Kangana Ranaut : अजय देवगण- सुदीपच्या हिंदी वादात कंगनाची उडी, 'संस्कृत'ला राष्ट्रभाषा करण्याची मागणी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि साऊथ अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच वॉर चर्चेत आहे. याच मुद्दाच्या वॉरमध्ये आता बेधडक आणि पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सहभागी झाली आहे. यात तिने हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देण्यास नकार देत सर्वात जुन्या संस्कृत भाषेला राष्ट्रभाषा करण्याची मागणी केली आहे.

कंगना राणावत (Kangana Ranaut) तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात तिने ‘हिंदी’ भाषेच्या या वादावर वक्तव्य केले. यात तिने आपला देश विविधतेने, विविध भाषांनी आणि विविध संस्कृतींनी नटलेला आहे. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.परंतु, आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी एक धागा महत्वाचा आहे. आपल्या राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले आहे. परंतु, हिंदीपेक्षा तमिळ जुनी आहे. तर त्यापैक्षाही संस्कृत ही भाषा फारच जुनी आहे. आणि यामुळेच मला वाटते की, आपली राष्ट्रभाषा संस्कृत असली पाहिजे असे म्हटले आहे.

यापुढे तिने कन्नड, तमिळ, गुजराती ते हिंदी सर्व भाषा संस्कृतमधून आल्या आहेत. परंतु, संस्कृत सोडून, हिंदीला राष्ट्रभाषा का बनवले गेले? याचे उत्तर माझ्याकडे नाही. जेव्हा तुम्ही हिंदी नाकारता, तेव्हा तुम्ही आपले संविधानही नाकारता. सर्वोच्च न्यायालय असो, कोणत्याही प्रकारचे कायदा असो. दिल्लीत सरकार जे काही करते, ते हिंदी भाषेत करते, नाही का? असेही तिने म्हटले आहे.

जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश असो, त्यांना त्यांच्याच भाषांचा अभिमान वाटत असतो. वसाहतीचा इतिहास कितीही काळा असला, तरी इंग्रजी हा संवादाचा दुवा बनला आहे. इंग्रजी ही एकात्म भाषा असावी का? आणि हिंदी, संस्कृत किंवा तमिळ ही जोडणारी भाषा असावी? हे आपण ठरवायचे आहे.’ असेही तिने म्हटले आहे.

साऊथचे चित्रपट इतके यशस्वी का होतात? या प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणली की, ‘आमचे चित्रपट तामिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये डब करतो आणि चित्रपट देशातील इतर राज्यांमध्ये घेऊन जातो. दक्षिण भारतातील चित्रपटांमधला वाद हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना नेहमीच सावत्र आईची वागणूक मिळाली आहे. त्यामुळेच आज त्यांना विजयी झाल्यासारखे वाटत आहे. त्यांच्यावर असा अन्याय व्हायला नको होता. आता ते त्यांचे हक्क व्यक्त करत आहेत, आपण सगळे भारतीय आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. मला खूप आनंद होत आहे की, त्यांना त्यांचे हक्क मिळत आहेत’, असेही ती यावेळी म्हणाली.

नुकतेच अभिनेता किच्चा सुदीप एका कार्यक्रमादरम्यान हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचे सांगितले होते. ज्यावर अजय देवगणने एक ट्विट करून मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत का बनवता? असे विचारले होते. हिंदी भाषेची वाद एकदा दक्षिण ते उत्तर भारतात सुरू झाला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button