

पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीपिकाची ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवात विशेष आणि अत्यंत प्रतिष्ठित ज्युरी म्हणून निवड झालीय.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आठ सदस्यीय ज्युरीमध्ये भारतीय सुपरस्टार दीपिका पदुकोणचा समावेश करण्याची घोषणा कान महोत्सवाने केली आहे. या ज्युरीचे अध्यक्ष फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन असतील आणि दीपिकासोबत, ज्युरीच्या यादीत इराणी चित्रपट निर्माते असगर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस, अभिनेत्री पटकथा लेखक निर्माती रेबेका हॉल, इटालियन अभिनेत्री जास्मिन त्रिंका, फ्रेंच दिग्दर्शक लाडो ली, अमेरिकन दिग्दर्शिका यांचा समावेश आहे. दिग्दर्शक जेफ निकोल्स आणि नॉर्वेचे दिग्दर्शक जोआकिम ट्रियर आहेत.
दीपिका पदुकोणने तिच्या शानदार कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभिनय केला आहे. तिला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. तिच्या चित्रपटांचा आतापर्यंत इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समावेशही आहे.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये कान्सने तिला आयकॉन सांगत भारतातील मोठी स्टार असल्याचे म्हटले आहे. दीपिकाने ३० हून अधिक चित्रटांमध्ये काम केले आहे. दीपिकाने xXx: द रिटर्न ऑफ जेंडर केज चित्रटात मुख्य भूमिका साकारत हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विन डीजेलने भूमिका साकारली होती."
इतकंच नाही तर तिने 'छपाक' आणि '८३' या चित्रपटातही काम केलं आहे. द इंटर्न या चित्रपटातही ती दिसणार आहे. २०१५ मध्ये, तिने The Live Love Laugh Foundation ची स्थापना केली, ज्यांच्या कार्यक्रमांचा उद्देश मानसिक आजारांना संबोधित करणे आणि मानसिक आरोग्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. २०१८ मध्ये, टाईम मासिकाने तिला जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केले होते.