Chandramukhi : माधुरीला पाहायचा आहे ‘चंद्रमुखी’! | पुढारी

Chandramukhi : माधुरीला पाहायचा आहे ‘चंद्रमुखी’!

पुढारी ऑनलाईन : 
हिंदीत आपल्या नावाचा डंका वाजवलेली मर्‍हाटमोळी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीने ‘बकेट लिस्ट’सारखा मराठी चित्रपटही केला, शिवाय मराठी चित्रपटाची निर्मितीही केली आहे. हिंदीत हीरोईन म्हणून काम करीत असताना मराठीत एक तर विनोदी चित्रपट किंवा सासू-सुनांचे (रडवे) चित्रपट बनत होते, त्यामुळे आपल्याला संधीच नव्हती, चांगली कथा असलेला चित्रपट मिळाला असता तर त्यावेळीच मराठीत काम केले असते, असे तिने एका मुलाखतीत म्हटले होते.

मात्र, उशिरा का असेना तिने मराठी चित्रपट केलाच, शिवाय सध्या मराठीत जे देश-विदेशात प्रशंसेला पात्र ठरणारे दर्जेदार चित्रपट बनत आहेत, त्याचे तिला कौतुकही आहे. आताही तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘चंद्रमुखी’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट विश्‍वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित आहे.

सध्या सर्वत्र त्यामधील गाणी, ट्रेलर, टीझर, पोस्टरची चर्चा आहे. हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर माधुरीने त्याचा ट्रेलर शेअर करून त्याचे कौतुक केले व हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता असल्याचे सांगितले. यापूर्वी रितेश देशमुख, कॉमेडियन भारती सिंह यांनीही या चित्रपटाला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

RRR ची स्टोरी ऐकुया कोल्हापूरच्या चौकातून | RRR story And Kolhapur

 

Back to top button