Shraddha Kapoor : श्रद्धाच्या बेबी पिंक रंगाच्या 'स्पोर्ट्स ब्रा'नं चाहते घायाळ | पुढारी

Shraddha Kapoor : श्रद्धाच्या बेबी पिंक रंगाच्या 'स्पोर्ट्स ब्रा'नं चाहते घायाळ

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor) गेल्या महिन्यात तिच्या आणि बॉयफ्रेंड फोटोग्राफर रोहन श्रेष्ठच्या ब्रेकअपने चर्चेत आली होती. श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असून आपले अपडेट चाहत्यासोबत शेअर करत असते. सध्या श्रद्धाच्या बेबी पिंक रंगाच्या स्पोटर्स ब्राने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने ( Shraddha Kapoor) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर बेबी पिंक रंगाच्या स्पोर्ट्स ब्रामधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्रद्धा खास करून सिंपल लूक आणि विना मेकअपमध्ये खूपच गॉर्जियस दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने फक्त ‘🩰’असा हटके ईमोजी दिला आहे. या फोटोत खास म्हणजे, श्रद्धा कपूरची टोन्ड फिगर दिसून येत आहे. यावरून वयाच्या ३५ वर्षीही श्रद्धा फिटनेस मेंटेन करत असल्याचे दिसतेय.

श्रद्धाच्या एका फोटोत कॅमेऱ्यासमोर टोन्ड फिगर स्पष्टपणे समोरून दिसली. तर दुसऱ्या फोटोला पोझ देताना तिने आपल्या डाव्या बाजुला पाहिल्याचे दिसून येत आहे. श्रद्धाचा हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी श्रद्धाच्या फिगरचे कौतुक करत भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सनी ‘Gorgeous 😍’, ‘Looking so hot 🔥’, ‘Wow 😯’. दुसऱ्या एका युजर्सने ‘😍😍😍😍soooo beautiful’, ‘Gorgeous Queen 😍❤🔥🔥’. असे लिहिले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी श्रद्धाच्या फोटोवर कॉमेन्टस करताना स्मायली आणि हार्ट ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी श्रद्धाने सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला होता. या फोटोमध्ये श्रध्दाच्या हातात एक पुस्तक दिसत होते. हा फोटो शेअर करत श्रद्धाने चाहत्यांना ‘तुमचे आवडते पुस्तकाचे नाव सांग?’ असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना अनेक चाहत्यांनी पुस्तकांची नावे शेअर केली होती. याशिवाय श्रद्धाने गुडीपाडव्याच्या निमित्ताने पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या नऊवारीत दिसली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🍂, Happy Gudi Padwa!💜’. असे लिहिले होते.

श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती रणबीर कपूरसोबत आगामी ‘लव रंजन’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘चालबाज इन लंडन’, ‘स्त्री २’ आणि विशाल फुरिया याचा ‘नागीन’ चित्रपट आहेत. श्रद्धा शेवटची टायगर श्रॉफसोबत ‘बागी ३’ मध्ये दिसली होती.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Back to top button