पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री छवी मित्तल (chhavi mittal) हिने डेली सोपच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. ती आता तिच्या आजारपणामुळे चर्चेत आली आहे. छवी मित्तल (chhavi mittal) हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले होते. आता तिने तिला ब्रेस्ट कॅन्सर कसा झाला, हे सांगितले आहे.
टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलने नुकताच खुलासा केला आहे की, ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक लांबलचक पोस्ट लिहून ही माहिती दिलीय. तिने सांगितले होते की, ती या भयंकर आजाराशी कशी लढत आहे. यासोबतच तिने ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त सर्व महिलांना धीर दिला. आता त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हा आजार कसा झाला हे सांगितले आहे.
तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की, वर्कआउट दरम्यान तिला अचानक छातीत दुखलं. त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. तिथे तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे कळले. व्हिडिओमध्ये छवी म्हणते, 'आज मी ही एक्सरसाईज यासाठी केला की कारण त्यानेच माझं आयुष्य वाचवलंय. मी स्वत:चे आभार मानले. मी चेकअपसाठी गेले आणि तेथे माझ्या शरीरात गाठ असल्याचे कळले. यानंतर माझं MRI, अल्ट्रासाऊंड आणि नंतर बॉयोप्सी झालं, तेव्हा समजलं की, ही कॅन्सरची गाठ आहे.'
छविने महिलांना सल्ला दिलाय की, महिलांनी दर ६ महिन्यांनी आपलं चेकअप करायला हवं. आम्ही सर्वकाही आपल्या भाग्यावर सोडू शकत नाही. चाळीशी पार केलेल्या महिलांनीही आपलं चेकअप करवून घ्यावं. सेल्फ एक्झामिनेशन आणि हे जाणून घेणं की नॉर्मल ब्रेस्ट तुम्ही कशा पध्दतीने अनुभवता. त्यामुळे समस्या लवकर लक्षात येईल.
आणखी एका पोस्टमदध्ये तिने म्हटलंय की, ती सर्जरीची तयारी करत आहे.ती लिहिते-'काय तुम्ही तो हलक्या गुलाबी रंगाचा टेप पाहिला. जो माझ्या शर्टवर दिसत आहे. तो बॉयोप्सीच्यानंतरचा टेप आहे. मी बॉयोप्सी केलं. यावेळचे मिळते-जुळते इमोशन्स आहेत. परंतु, मी माझ्या डोक्यातून हे विचार, चिंता रोकण्याचा प्रयत्न करत आहे.'