पिंपरी : कारच्या धडकेत वृद्धेचा अपघाती मृत्यू | पुढारी

पिंपरी : कारच्या धडकेत वृद्धेचा अपघाती मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालकासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील मृत महिला व जखमी झालेले सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथे निघाले होते. गुरुवारी (दि. 14) सायंकाळी पाचच्या सुमारास संत तुकारामनगर, पिंपरी येथे ही घटना घडली.

नवी दिल्ली : जहांगीरपुरीतील ‘बुलडोजर’ कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी

अहिल्याबाई शिंदे (वय 75), असे मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर, रिक्षा चालक राजू गुंडाप्पा धोत्रे याच्यासह मालती कांबळे व रोहिणी गायकवाड या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी वर्षा रमेश खरात (41, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी सोमवारी (दि. 18) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारचालक चंदर नंदलाल लकवानी (63, रा. पीडब्ल्यूडी कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फिर्यादी यांची आत्या अहिल्याबाई शिंदे शेजारी राहणार्‍या महिलांसोबत रिक्षाने पिंपरी येथील आंबेडकर चौक येथे जात होत्या.

दरम्यान, संत तुकाराम नगर येथे आरोपी चालवत असलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अहिल्याबाई शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

केवळ तीस सेकंदांतच होणार जमिनीची मोजणी 

तर, रिक्षा चालक राजू धोत्रे, मालती कांबळे आणि रोहिणी गायकवाड हे गंभीर जखमी झाले. जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button