beast : ओपनिंगबाबत उत्सुकता! सोशल मीडियावर चाहत्यांकडून ट्विटचा पाऊस

beast
beast

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक (रजनीकांतपेक्षाही अधिक!) मानधन घेणारा सुपरस्टार थलपती विजय याचा नवा चित्रपट 'बीस्ट' (हिंदीत 'रॉ') बुधवारी प्रदर्शित होत आहे. विजयचे चाहते देश-विदेशात असल्याने तसेच 'बीस्ट'ची गाणी आणि ट्रेलर आधीच लोकप्रिय झालेले असल्याने या चित्रपटाला मोठीच 'ओपनिंग' मिळेल असा समीक्षकांचा अंदाज आहे.

दक्षिणेतील आणखी एक स्टार यश याच्या 'केजीएफ चॅप्टर-2' मुळे 'बीस्ट'च्या कमाईवर परिणाम होतो का हे सुद्धा पाहावे लागणार आहे. सध्या तामिळनाडूबरोबरच संपूर्ण देशभर 'बीस्ट'ची जोरदार तिकीट विक्री सुरू आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 50 कोटी रुपयांच्या कमाईचा बेंचमार्क पार करेल असे म्हटले जात आहे.

जगभरात पहिल्या दिवशी सुमारे 60 ते 65 कोटी रुपयांची कमाई होईल असाही अंदाज आहे. हिंदी पट्ट्यात विजयच्या 'मास्टर'च्या तुलनेत हा चित्रपट अधिक कमाई करेल असेही मानले जात आहे. 'मास्टर' कोरोना काळात प्रदर्शित होऊनही सुपरहिट झाला होता, हे विशेष! आता 'बीस्ट' पहिल्याच आठवड्यात सहजपणे शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई करेल असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news