नाशिक : खरेदीच्या बहाण्याने महागडे हिर्‍यांचे दागिने लंपास | पुढारी

नाशिक : खरेदीच्या बहाण्याने महागडे हिर्‍यांचे दागिने लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरेदीच्या बहाण्याने महिला व पुरुषांनी तिडके कॉलनीतील एका दुकानात चोरी करून महागडे हिर्‍यांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दिनेश ताराचंद धोका (46, रा. गंगापूर रोड) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोन महिला व दोन पुरुषांविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

दिनेश यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवार (दि. 7) ते शुक्रवार (दि. 8) दरम्यान 25 ते 30 वयोगटातील चार संशयित चोरटे हे दिनेश यांच्या कंचनपुष्प जेम्स अ‍ॅण्ड ज्वेल्स या दुकानात आले होते. त्यांनी दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानातील 80 हजार रुपयांचे हिर्‍यांचे 104 नग चोरून नेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button