prajakta mali : प्राजक्ताचा फिटनेस, पाहा तिच्या डेली रुटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? | पुढारी

prajakta mali : प्राजक्ताचा फिटनेस, पाहा तिच्या डेली रुटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : हसतमुख, मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali ) हिचं सौंदर्य दिवसेंदिवस खुलत चाललं आहे. तिचा अभिनय तर आपण सर्वांनी पाहिलाच आहे. आपल्या निखळ सौंदर्यासोबतचं प्राजक्ता (prajakta mali) स्वत:कडेही लक्ष देताना दिसते. स्वत: फिट राहण्यासाठी ती कोणत्या गोष्टी करते, तुम्हाला माहितीये का? आपण जरादेखील जास्त खाल्लं तरी आपलं वजन वाढत जातं. पण, वेगवेगळे पदार्थ  आवडणाऱ्या प्राजक्ताने स्वत:ला मेंटेन कसे ठेवले आहे पाहा.

प्रत्येक कलाकाराला आपलं फिटनेस मेंटेन ठेवावा लागताे. त्यात जिम, वर्कआऊट, योगा आणि आहाराचाही समावेश होतो. प्राजक्ता आपल्या खास लूकसाठी करते तरी काय? ती स्वत:वर कशी लक्ष देते? बिझी शेड्यूलमधून व्यायाम करायला वेळ कसा काढते? तिच्याबद्दल या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत? तर मग चला जाणून घेवूया ही माहिती…

प्राजक्ता माळी जुळून येती रेशिमगाठी या मालिकेतून घराघरात पोहोचली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवलीय. प्राजक्ता माळीचं ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्हालाही विश्वास नाही बसणार. मराठी कलाविश्वात तिने आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. तिला कुठलीही भूमिका दिली तरी ती त्या भूमिकेत परफेक्ट बसते. मालिकेच्या कथानुसार जसे पात्र असेल त्यानुसार भूमिका साकारणं आव्हानात्मक असतं. ते लिलया पेलण्याच काम प्राजक्ताने केलं आहे.

मस्त महाराष्ट्र या कार्यक्रमातून तिने महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव सर्वांसमोर आणली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये फिरली. तेथीली संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीवर तिने व्लॉग्ज केले. अर्थातचं तिला फिरायचीही आवड आहे.

फिटनेसवर आहार आणि लक्ष

प्राजक्ताचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले तर तिने अनेक खाद्यपदार्थांचे फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय, ती ज्या – ज्या ठिकाणी फिरायला गेली, तेथीलचं अन्नपदार्थ, डिशचे फोटो तिने शेअर केले आहेत. याशिवाय ती स्वत:च्या फ़िटनेसवर लक्ष केंद्रित करते.

तिने स्वत:च्या रोजचा दिनक्रम निश्चित केलाय. तिच्या डेली रुटीनमध्ये योगा असतोच. तिचे योगाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतात. तिच्या मते अष्टांग योगा केल्याने चेहर्‍यावर ग्लो येतो. शरीर फिट राहते.

Back to top button