बॉलिवूडमध्ये येणार का? महेशबाबू म्हणतो... | पुढारी

बॉलिवूडमध्ये येणार का? महेशबाबू म्हणतो...

पुढारी ऑनलाईन

दाक्षिणात्य सुपरस्टार्समध्ये महेशबाबूचा समावेश होतो. (या सुपरस्टारची पत्नी म्हणजे मर्‍हाटमोळी नम—ता शिरोडकर!) सध्या दक्षिणेतील अनेक स्टार हिंदीत येत असल्याने मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान महेशबाबूला याबाबतचा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, मला हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही. मी फक्‍त तेलुगू चित्रपटातच काम करू शकतो! महेशबाबूला हॉलीवूडचीही ऑफर आल्याचे म्हटले जाते. त्यावर त्याने सांगितले की, त्याला अद्याप कोणत्याही हॉलीवूड चित्रपटाची ऑफर आलेली नाही. दरम्यान, प्रभास, धनुष आणि विजय देवरकोंडा हे दाक्षिणात्य सुपरस्टार सध्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. अर्थात, महेशबाबू सध्या तरी त्यासाठी उत्सुक नाही.

Back to top button