Kishori Shahane : किशोरी शहाणेचा लेकासोबत धमाल डान्स (Video) | पुढारी

Kishori Shahane : किशोरी शहाणेचा लेकासोबत धमाल डान्स (Video)

पुढारी ऑवलाईन : अभिनेत्री किशोरी शहाणे ( Kishori Shahane ) यांनी मराठी चित्रपटांसोबत अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे. तर किशोरीच्या मुलगा बॉबी वीज देखील आईच्या पाउलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याच दरम्यान किशोरी आणि मुलगा बॉबी वीज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

किशोरी शहाणेने ( Kishori Shahane ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर मुलाग्यासोबतचा एक धमाकेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत किशोरी आणि बॉबी वीज दोघेजण अरेबिक कुंथू ‘मर्म पित्ता पित्ता दे’ या गाण्यावर धमाल डान्स केला आहे. यावेळी किशोरी आणि बॉबीने ब्लॅक रंगाच्या शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान केले आहे. यावेळी खास करून आई आणि मुलग्याने एकाच रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओतील खास म्हणजे, किशोरी आणि बॉबीने धोतर (लुंगी ) घालून डान्स केला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Arabic kuthu @bobbyvij17 🕺💃’असे लिहिले आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. याशिवाय दोघांच्या डोळ्यावर चष्मा असून व्हिडिओ एका रूममध्ये केला असल्याचे समजते. व्हिडिओच्या शेवटी बॉबी पुढे येताना आणि कॅमेऱ्याला टच करताना देखील दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कॉमेन्टस केल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री मिताली नाग हिने दोन हास्याचा ईमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर काही चाहत्यांनी ‘सुंदर’, ‘क्यूट डान्स’, ‘सुंदर माऊली बोथ भारी’, ‘ऊफ…,’ ‘झक्कास’ यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी बॉबी सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचे वृत्त समोर आले होते. यात दरम्यान बॉबीला इंडस्ट्रीत कोणी घेत का नाही? यावर किशोरीने भाष्य केले होते. किशोरी शहाणे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या अपडेट देत असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Shahane Vij (@kishorishahane)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Mundhe (@kmundhe4442)

Back to top button