Aishwarya narkar : मोकळ्या केसांत ऐश्वर्याची हटके स्टाईल (video)

Aishwarya narkar : मोकळ्या केसांत ऐश्वर्याची हटके स्टाईल (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकरची ( Aishwarya narkar ) खास अशी ओळख आहे. वयाची ५० पार केल्यानंतरही ऐश्वर्याच्या सौंदर्य, हटके स्टाईल, दिलकश अदांनी चाहते फिदा आहेत. सध्या तिचे नवनविन हटके व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओत ती मराठमोळ्या अंदाजात बिनधास्त दिसत आहे.

ऐश्वर्या नारकर ( Aishwarya narkar ) यांनी नुकताच इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या प्रिटेंड साडीत स्टायलिश अंदाजात ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी ती एका झाडाच्या पाठीमागून हटके स्टाईलमध्ये रस्त्यावर चालताना दिसली. तिने आपल्या डोळ्यावर चष्मा परिधान केला आहे. या व्हिडिओत तिचे हटके चालणे आणि सोडलेल्या मोकळ्या केसांनी चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'प्रत्येक गोष्ट लहरी असते…❤️❤️, Thank you @kasarjanhavi for the efforts..you are a amazing soul❤️❤️'. असे लिहिले आहे. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी तिचे चाहते आजही तिचे दिवाने आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी खूपसाऱ्या कॉमेन्टस केल्या आहेत.

याआधीही ऐश्वर्याने मालिकेच्या सेटवरील नऊवारी साडीतील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मराठमोळ्या लूकमध्ये हटके दिसत आहे. यावेळी ती निळ्या रंगाच्या साडीसोबत साजेशीर दागिने परिधान केले आहेत. या व्हिडिओतील खास म्हणजे, तिने आपल्या नजरेने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तर या व्हिडिओत 'तेरी अदा पे तो हम फिदा हैं' हे गाणे वाजत आहे.

याशिवाय ऐश्वर्याने खादी कॉटनची साडी नेसून आणखी एक फोटोशूट केले आहे. या फोटोतील तिच्या पोझवर चाहत्याच्या नजरा खिळल्या आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. ऐश्वर्याच्या इंन्स्टाग्रामवर अनेक नवनविन फोटो पाहायला मिळतात. ऐश्वर्याने 'अपराध', 'धड़क', 'अंकगणित' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news