पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्याप्रकरणी आज
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अविश्वास प्रस्ताव हा परकीय देशांचा कट होता, या आरोपाची आम्हाला चौकशी करावी लागेल, असे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट केले. याप्रकरणी आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाबाहेर इम्रान खान यांचे निकटवर्ती नेता फवाद चौधरी आणि पत्रकारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
इम्रान खान सरकारविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. इम्रान खान यांच्या सल्ल्याने उपसभापतीने अविश्वास प्रस्ताव फेटाळला होता. पाकिस्तान संसद बरखास्त करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज यावर पुन्हा सुनावणी झाली. अविश्वास प्रस्ताव हा परकीय देशांचा कट होता, या आरोपाची आम्हाला चौकशी करावी लागेल, असे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
आज सुप्रीम कोर्टाबाहेर इम्रान खा यांचे निकटवर्ती नेता फवाद चौधरी हे सुप्रीम कोर्टात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यावर फवाद भडकले. त्यांनी पत्रकारांनाच आरोप केले. पत्रकार आणि फवाद यांच्या जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी आज पुन्हा एकदा देशात सार्वत्रीक निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. ९० दिवसांमध्ये निवडणुक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
हेही वाचलं का?