‘बाहुबली’त बाण चालवणार्‍या अवंतिकाचा ग्लॅमरस अवतार | पुढारी

‘बाहुबली’त बाण चालवणार्‍या अवंतिकाचा ग्लॅमरस अवतार

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या प्रचंड गाजलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटात योद्धा अवंतिकाची भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री तमन्‍ना भाटियाचा हॉट आणि बोल्ड अवतार खूपच पसंत केला जात आहे. सध्या तिची व्हेकेशनवरची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओेत तमन्‍ना ढगाळ वातावरणाचा मनसोक्‍त आस्वाद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओे काही दिवसांपूर्वीचा असला तरी तो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केला जात आहे. तमन्‍नाच्या वर्कफ्रंटचा विचार करावयाचा झाल्यास ती लवकरच ‘बबली बाऊन्सर’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सौरभ शुक्‍ला, अभिषेक बजाज आणि साहील वेद हे अभिनेते प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरपपर्यंत रीलिज होण्याची शक्यता असून तो हिंदीबरोबरच तमिळ व तेलगूमध्येही रीलिज करण्यात येणार आहे.

Back to top button