Acharya: बाप-लेक चिरंजीवी-राम चरण आमने-सामने | पुढारी

Acharya: बाप-लेक चिरंजीवी-राम चरण आमने-सामने

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम चरणचा ‘RRR’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आरआरआर रिलीज झाल्यापासून ‘राम चरण’ची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय. आता राम चरणबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी पाहून राम चरणचे फॅन्स नक्कीच खूश होतील. (Acharya) वास्तविक, ‘राम चरण’ आणि त्याचे वडील, अभिनेते सुपरस्टार ‘चिरंजीवी’ यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी फॅन्स आतुर झाले आहेत. आता या पिता-पुत्राची जोडी लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटात दिसणार आहे. ((Acharya))

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक कोरतला शिवा हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. ‘आचार्य’ हा एक तेलुगू अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे जो २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेगा स्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण या चित्रपटात पूजा हेगडेसोबत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत काजल अग्रवालही दिसणार आहे.

हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होता. पण, निर्मात्यांनी रिलीज डेटविषयी काही सांगितलं नाही. मणि शर्माने चित्रपटाला बॅक्राऊंड स्कोर दिला आहे आणि तीरू यांनी सिनेमेटोग्राफी केली आहे.

या संदर्भात बोलताना ‘अन्वेश रेड्डी’ या चित्रपटाच्या निर्मात्याने एक मोठा खुलासा केला आहे. अन्वेश रेड्डी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, आचार्य चित्रपटात पिता-पुत्राची जोडी पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. तो पुढे म्हणाले की, ‘याआधीही त्याने स्क्रीन शेअर केली आहे पण तो एक छोटासा कॅमिओ होता.

‘चिरंजीवी’ने २०१३ साली राम चरणच्या ‘मगधीरा’ चित्रपटात कॅमिओ केला होता. ज्यामध्ये दोघांच्या डान्सने प्रेश्रकांना थिरकले होते आणि आता ते दोघे संपूर्ण चित्रपटासह पडद्यावर एकत्र येत आहेत. दोघांना एकत्र पाहण्याची उत्सुकता फॅन्समध्ये दिसून येते. आता ही पिता-पुत्राची जोडी या चित्रपटात काय धमाल करेल, पाहुया.

मेगास्टार चिरंजीवी हे मेहर रमेश यांच्या भोलाशंकर चित्रपटात दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Always Ramcharan fc (@royalcharan_fc)

Back to top button