ऑस्कर : प्रियांका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर ऑस्करमध्ये, फ्लॉन्ट केले बेबी बंप | पुढारी

ऑस्कर : प्रियांका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर ऑस्करमध्ये, फ्लॉन्ट केले बेबी बंप

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑस्कर सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यादरम्यान अनेक सेलेब्सनी आपली चुणूक दाखवली. यापैकी एक होती प्रियांका चोप्राची जाऊबाई आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर. सोफी तिचा पती जोई जोनाससोबत या अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती. यादरम्यान, अभिनेत्री सोफी टर्नर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. अभिनेत्री सोफी टर्नर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. लाल रंगाच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

तिने पती जोई जोनाससोबत रेड कार्पेटवर कॅमेऱासाठी पोज दिली. २६ वर्षीय सोफीने ऑस्कर पार्टीसाठी फ्लोअर टच लांब बाही असलेला लाल गाऊन परिधान केला होता. ग्लॉसी लिपस्टिक आणि कमीत कमी मेकअपमध्ये आणि स्लीक पोनीटेलमध्ये हेअरस्टाईल करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

sophie turner

तिने हा सुंदर गाऊनसोबत स्पार्कली ड्रॉप इअररिंग्स आणि पीअर-आकाराच्या एंगेजमेंट रिंग घातलेली दिसली. २९ जून, २०१९ रोजी सोफीने तिचा प्रियकर जो जोनाससोबत पॅरिसमध्ये लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लग्नाच्या एका वर्षानंतर सोफी आई झाली. २०२० मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. जो आणि सोफीच्या लग्नाबद्दल सांगायचे तर त्यांनी त्यांच्या लग्नात पांढरा गाऊन परिधान केला होता. तर जो जोनास ब्लॅक अँड व्हाईट कोट पँटमध्ये दिसला होता.

sophie turner

जो जोनास आणि सोफी टर्नर यांचा शाही विवाह पॅरिसमधील Chateau नावाच्या राजवाड्यात पार पडला.१८ व्या शतकात बांधलेल्या या महालात एका रात्रीच्या मुक्कामाचा खर्च सुमारे ३.२१ लाख रुपये आहे. यापूर्वी या जोडप्याने १ मे, २०१९ रोजी लास वेगासमध्ये लग्न केले होते. तो एक खाजगी सोहळा होता. यामध्ये दोघांचे जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीयच सहभागी झाले होते. सोफी ही अमेरिकन टीव्ही सीरियल गेम ऑफ थ्रोन्सची अभिनेत्री आहे.

हेही वाचलं का?

Back to top button