‘द कश्मीर फाइल्स’चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या अडचणीत वाढ; वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार | पुढारी

'द कश्मीर फाइल्स'चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या अडचणीत वाढ; वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई; पुढारी ऑनलाईन :  ‘द कश्मीर फाइल्स’चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता नव्या वादात सापडले आहेत. ‘भोपाली’ म्हणजे ‘समलैंगिक’ या त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पत्रकार आणि सेलिब्रिटी मॅनेजर रोहित पांडे यांनी भोपाळमधील नागरिकांना समलैंगिक म्हटल्याप्रकरणी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेले विवेक अग्निहोत्री आता स्वत:च केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत.

या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले हाेते की, “मी भोपाळमध्ये वाढलोय; पण भोपाळचा नाहीये, कारण ते वेगळ्या स्वभावाचे असतात. मी तुम्हाला पुन्हा कधीतर[ याबद्दल सांगेन. तुम्ही हवं असेल तर कोणत्याही भोपाळी व्यक्तीला विचारू शकता. कोणाला तरी सांगितलं की, भोपाळी आहे तर याचा सरळ अर्थ आहे की, तो होमोसेक्श्युअल (समलैंगिक) आहे. म्हणजेच तो नवाबी छंदाचा आहे.”

 त्याचे हे विधान वादाचा विषय ठरले आहे. मूळचे भूपाळचे रहिवासी असणारे रोहित पांडे यांनी त्यांचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, अनेकांनी अग्निहोत्रीला ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. काहींनी असे म्हटले आहे, की “विवेक अग्निहोत्री हा तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो, सामान्य भोपाळी माणूस असा नाही.

विवेक अग्निहोत्री यांच्यावादग्रस्त विधानामुळे अग्निहोत्रींवर सर्वच क्षेत्रातून तसेच भूपाळ शहरातून मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा गवगवा कमी होऊ लागला आहे. त्याच्या कमाईत सुद्धा घट होऊ लागली आहे. त्यामुळेच त्याच्या माध्यमातू हा सिनेमा पुन्हा चर्चेत रहावा यासाठी विवेक अग्निहोत्री वाटेल वादग्रस्‍त वक्तव्ये करत सुटल्‍याचे काहीनी म्‍हटलं आहे.

Back to top button