RRR collections : ‘आरआरआर’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; पहिल्या दिवशी २२३ कोटींचा जमवला गल्ला! | पुढारी

RRR collections : ‘आरआरआर’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; पहिल्या दिवशी २२३ कोटींचा जमवला गल्ला!

पुढारी ऑनलाईन डेस्क

ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट या दिग्गज कलाकारांच्या भूमिकांनी सजलेला दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ (RRR Movie) चित्रपट काल शुक्रवारी (दि.२५) पडद्यावर झळकला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात २२३ कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक (Film trade analyst) तरण आदर्श (taran adarsh) यांनी ट्विट करत या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे जाहीर केलेत.

आंध्र प्रदेशमध्ये ‘आरआरआर’ने ७५ कोटी, तेलंगणा २७.५ कोटी, कर्नाटक १४.५ कोटी, तामिळनाडू १० कोटी, केरळ ४ कोटी, उत्तर भारत २५ कोटी असे मिळून संपूर्ण देशात चित्रपटाने पहिल्या दिवशी १५६ कोटींची कमाई केली आहे. तर अमेरिकेत ४२ कोटी आणि अन्य देशांत २५ कोटींचा गल्ला जमवला आहे. देश-विदेशात मिळून चित्रपटाने २२३ कोटी रुपये कलेक्शन केले असल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे. RRR चे ४५० कोटी रुपये आहे.

एस एस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘RRR’ सिनेमागृहांमध्ये काल देशभरात प्रदर्शित झाला. दक्षिणेतील प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच प्रचंड लोक थिएटरच्या बाहेर जमून जयघोष करत होते. तर काहींनी अभिनेता रामचरणच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. याचे व्हिडिओही ट्विटर व्हायरल झालेत. अनेक दिवसांपासून आरआरआर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता रामचरण, आलिया भट्ट, एनटीआर ज्युनिअर, अजय देवगण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.

बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट ( #RRR movie ) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. परंतु, ‘आरआरआर’ येताच बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याची माहिती मिळाली आहे. एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ ( #RRR movie ) हा चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ला सध्या टक्कर देत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने गेल्या १५ दिवसांत एकूण २११.८३ कोटींची कमाई केली आहे. परंतु, ‘आरआरआर’ चित्रपट थेअटरमध्ये येताच कश्मीर फाइल्सचे कलेक्शन कमी झाले आहे.

 

Back to top button