Fan Made Posters : दीपिकाने शेअर केले फॅन्सने काढलेले स्केचेस, रियॅक्ट झाला रणवीर  | पुढारी

Fan Made Posters : दीपिकाने शेअर केले फॅन्सने काढलेले स्केचेस, रियॅक्ट झाला रणवीर 

 पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुडची मस्तानी अशी ओळख असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या फॅन्सनी काढलेले स्केचेस आणि पोर्ट्रेट (Fan Made Posters)  शेअर करत म्हटले आहे की जेव्हा मला टॅग केलेले पाहते आणि तेव्हा मला सोने सापडले. दीपिका पादुकोणच्या काही फॅन्सनी तिच्या सुपरहिट चित्रपटातील कॅरक्टरचे स्केचेस आणि पोर्ट्रेट काढले होते. ते त्यांनी तिला टॅग करत इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिने काही तासांपुर्वी काही स्केचेस आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत म्हटले आहे की, ‘मी मला टॅग केलेल्या काही पोस्ट बघितल्या; तेव्हा मला हे सोनं सापडले.
Deepika Padukone
आजच्या घडीला दीपिका पादुकोण ही बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत एका पेक्षा एक चित्रपट करत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ओम शांती ओम मधील शांतीप्रिया/संध्या, पीकु मधील पीकु बॅनर्जी, छपाक मधील मालती, हॅप्पी न्यु इयर मधील मोहीनी, पदमावत मधील पदमावती या तिच्या भुमिका खुप गाजल्या. वेगवेगळ्या स्वरुपात आणि माध्यमातुन तिच्या या भुमिकांचे कौतुक चाहत्यांनी केले. पण तिच्या काही फॅन्सनी  या भुमिकांचे स्केचेस आणि पोट्रेट काढले होते. त्यांनी ते इन्स्टाग्रामवर शेअर करत तिला टॅग केले होते. या टॅग पोस्ट तिने एकत्रितरित्या स्केचेस आणि पोट्रेट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  तिच्या या पोस्टवर कॉमेंटचा वर्षाव होत आहे. रणवीरनेही “Byoodiful” अशी कॉमेंट केली आहे.
Deepika Padukone
रणवीर कपुर आणि दिपीका हे कपल बॉलिवुडमधील स्टार कपल म्हणुन ओळखले जाते. सोशल मीडियावर यांचा बराच मोठा  फॅनवर्ग आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातुन चाहत्यांशी शेअर करत असतात.
Deepika Padukone

Back to top button